Navnath Waghmare : स्वतःच्या मेहुण्याला वाचवण्यासाठी जरांगेंचं उपोषण, नवनाथ वाघमारे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Navnath Waghmare  सगळ्या वाळू माफियांचा आका मनोज जरांगे आहे. जरांगेंच्या मागे आता यापुढे साडेसाती लागली असून, पापाचा घडा भरल्यानं आता जरंगेंना जेलमध्ये जावं लागणार असल्याची टीका असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.Navnath Waghmare

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी ते बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. यावर वाघमारे म्हणाले, जरांगेंना फिरायला वाळू माफियांच्याच गाड्या होत्या. या वाळू माफियांवर कारवाई करून सरकारकडून जरांगेंच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरु आहे.

साखळी उपोषण हे बोगस उपोषण असते. लोक जेवण करून या उपोषणात बसतात. दम असेल तर जरांगेंनं पुन्हा आमरण उपोषण करावं, असं आव्हान वाघमारे यांनी जरांगे यांना दिलं.



जरांगे यांच्या सुरु होणाऱ्या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असून, स्वतःच्या मेहुण्याला वाचवण्यासाठी जरांगेंचं उपोषण आयोजित केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही केला आहे. जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत असलेली वाहने वाळू माफियांची आहेत. जरांगे पाटील वाळू माफियांच्या आधारावर आंदोलन करत असून, यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरीचा गंभीर धोका आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.वाळू माफियांचा आधार घेत आंदोलन घडवले जात असेल, तर हे घातक आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Navnath Waghmare’s allegation of Jarange’s hunger strike to save his own brother-in-law

महत्वाच्या बातम्या