Love Jihad’ : राज्यात लवकरच ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा, विशेष समिती स्थापन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Love Jihad’ राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद व फसवणूक , बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे.Love Jihad’

ही समिती राज्यातील सध्याची परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य ठरणार आहे.



उत्तर प्रदेश,हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी यापूर्वीच लव्ह जिहाद विरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी केली होती. राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर या विरोधात कायदा करण्याची ग्वाही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव,अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे ( विधी ) सचिव हे सदस्य असतील.

हिंदू समाज यापुढे ‘लव्ह जिहाद’च्या नावाने कुठलाही अन्याय सहन करणार नाही. कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत केली, तर आम्ही त्यांचे डोळे ठेवणार नाही. पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार असून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले होते.

Law against ‘Love Jihad’, special committee formed in the state soon

महत्वाच्या बातम्या