Jayakumar Gore मला संपविण्याचा प्रयत्न केला पण नियतीने तुमचा शेवट केला, जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकरांना टोला

विशेष प्रतिनिधी

सातारा : मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला. सुरूवात तुम्ही केली. पण नियतीने तुमचा शेवट केला असा टोला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंद केले होते. पण महायुतीत जिल्ह्यातील भाजप आणि प्रामुख्याने जयकुमार गोरे यांच्या सोबत असलेल्या वादामुळे त्यांनी फारकत घेतली. फलटणमधून रामराजेंच्या उमेदवाराचा विधानसभेला पराभव झाला. रामराजे यांचे चुलत बंधू संजीवराजे यांचे निवासस्थान आणि त्यांच्या व्यवसायावर नुकतीच प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकत चौकशी करण्यात आली.

Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका

यावर गोरे म्हणाले, ‘मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत. गेली २० वर्षे ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेले आहे. अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली. सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत.

रामराजे पुन्हा अजित पवारांशी जवळीक वाढवीत आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांनी त्यांना चांगलेच फटकारले होते. तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता”, असं म्हणत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांना इशारा दिला होता,

तुम्ही बंद दाराआड बैठका घेता, मात्र तुमच्यात धमक असेल ना तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जा मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता तुम्ही २५ ते ३० वर्षे झाली कारखाना चालवत आहात. एक अख्खी पिढी या कारखान्यावर मोठी झाली. मग तुम्ही नेमकं करता काय? तुमच्यात धमक आणि ताकद नाही का? तुम्ही तर श्रीमंत राजे आहात, असंही अजित दादांनी म्हणत रामराजेंना फटकारले होते.

Jayakumar Gore to Ramraje Naik Nimbalkar

महत्वाच्या बातम्या