विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sanjay Raut आमदार धसांचा बुरखा फाटलेला आहे. अजूनही धस मैदानात लढण्याचे नाटक करत असतील, ते करत राहावे, ‘बूंद से गयी, वो हौद से नहीं आने वाली’ असे म्हणतात, ते त्यांच्याबाबत लागू आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार सुरेश धस याना लगावला आहे.Sanjay Raut
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंडे यांची गुप्त भेट घेतली. यावर धस यांच्यावर डीलिंग केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याला उत्तर देताना धस म्हणाले होते की , ज्यांचे आयुष्य डील करण्यात गेले. डील केल्यामुळे त्यांच्या पक्षाची वास्तुशांती झाली. ते स्वत:हा डीलर आहे. एकदा तुरूंगात सुद्धा जाऊन आले आहेत. त्यांनी माझ्याबद्दल डील हा शब्द वापरणे पटत नाही.
धसांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “सोडून द्या, हो सुरेश धसांकडे काय पाहताय. धसांवर कुणी विश्वास ठेवेल, असे मला वाटत नाही. धसांचा बुरखा फाटलेला आहे. अजूनही धस मैदानात लढण्याचे नाटक करत असतील, ते करत राहावे. धसांनी मुंडेंची भेट घेतली. ज्याक्षणी मुंडे बैठकीसाठी आले, त्याक्षणी धसांनी तिथून बाहेर पडायला हवे होते. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वांना सांगायला पाहिजे होते की, मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी खंबीरपणे लढत आहे.
Boond Se Gayi, Woh Haud Se Nahin Aane Wali, Sanjay Raut’s attack on Suresh Dhas
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा