Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांनी केला हा विक्रम, एकाच वेळी 6854 अधिकाऱ्यांची घेतली बैठक

Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांनी केला हा विक्रम, एकाच वेळी 6854 अधिकाऱ्यांची घेतली बैठक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ आणि अजित पवार यांच्या उपस्थित 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रम केला. एकाच वेळी राज्याच्या संपूर्ण प्रशासनाशीच मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. Devendra Fadnavis

या बैठकीत आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाचा यामध्ये आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामं झाली त्यासंदर्भात चर्चा झाली.
नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करा, त्या इतरांनाही सांगा. गुंतवणूक येत असताना गुड गव्हर्नन्स द्या. संपूर्ण कालावधीचा आढावा आल्यानंतर 1 मे रोजी याचा सार्वजनिक कार्यक्रम करु.संकेतस्थळे फुलप्रूफ करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

यावेळी लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. यामध्ये

पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटील

सातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेख

संभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रा

मुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकर

गृह, अतिरिक्त मुख्य सचिव: इकबालसिंग चहल

आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: शेखर सिंग

आयुक्त, ठाणे महापालिका: सौरभ राव

मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडे

मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सन

जिल्हाधिकारी, नागपूर: विपीन इटनकर

जिल्हाधिकारी, जळगाव: आयुष प्रसाद

विभागीय आयुक्त, पुणे: डॉ. पुलकुंडवार

आदिवासी आयुक्त: लिना बनसोडे

आयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकर

सचिव, मृद व जलसंधारण: गणेश पाटील यांचा समावेश होता.

made this record, held a meeting of 6854 officials at the same time Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023