विशेष प्रतिनिधी
पुणे : Yogesh Kadam स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने विरोध केला नाही असे सांगत तिच्यावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केल्याचा आरोप करत विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. Yogesh Kadam
कदम पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला.
आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील’ त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पुणे- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का ? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत?
स्वारगेट मध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे.
पुणे- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का ?
स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत?
स्वारगेट मध्ये बलात्कार झाला आणि… pic.twitter.com/1fopFRkTru
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 27, 2025
आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलांना लाडक्या बहीण म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलाना सुरक्षित कसे वाटेल?
आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का?’ असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या बलात्काराची घटना घडल्यानंतर गृहराज्य मंत्री पीडितेने प्रतिकार केला नसल्याचे म्हणत आहेत. त्यांनी लवकर बरे व्हावे
Suspicion of a rape victim? The opposition criticises Yogesh Kadam
महत्वाच्या बातम्या
- स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकावणार, एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप