Ajit Pawar, : अजित पवार तुम्हाला मोदीही वाचवू शकणार नाहीत, अंजली दमानिया यांचा इशारा
सिंचन घोटाळ्यातून तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण यावेळी तुम्हाला फडणवीसच नव्हे तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोडवू शकत नाहीत. मी तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलाआहे. उद्या, बुधवारी सकाळी 10 वाजता मोठा गौप्यस्फोट करण्याचीही घोषणा केली.











