Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

आठ महिने उलटले तरी जीआर नाही; सातारा गॅझेटबाबत मनोज जरांगे आक्रमक

:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भात सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी  सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुणे, महाराष्ट्र

पालखी मार्गाचा कायापालट: वारकऱ्यांची वाट सुकर, सोबतीला जलसमृद्धी आणि निसर्गाचा वारसा!

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल आणि आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दोन्ही मार्गांचे सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही येत्या काळात युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र

महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सरकारचा मोठा निर्णय; कंपन्यांवर राहणार करडी नजर

टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणानंतर आता राज्यभरातील सर्वच कार्यालयांमध्ये सरकारची करडी नजर असणार आहे.सर्वच ऑफिसमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाला निर्बंध घालणाऱ्या नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यात येते की नाही?या सर्व गोष्टीची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.

पुणे

मुळा-मुठा नदी प्रकल्पाला गती; राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला तीन ठिकाणी मोफत जागा

महापालिकेचा महत्वाचा आणि मोठा असलेल्या मूळ मुठा नदीकाठ योजनेसाठी राज्यसरकाने शहरात तीन ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.या मोफत जागेमुळे प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे.

महाराष्ट्र, मुंबई

खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या कराळेंसह राज्यातील 53 वरिष्ठ आयपीएसच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 53 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले असून, याद्वारे राज्य पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.

मुंबई, delhi, महाराष्ट्र

धनुष्यबाण वादावर निर्णय लांबला; सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 30 जुलै

पुणे: आज रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही बाजूंचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर,बेजबाबदार विधान टाळा अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची कानउघडणी केली.शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी आता ३० जुलै रोजी होणार आहे.

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच परांजपे यांचा पक्ष प्रवेश, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर झाला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी आज केले. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे, महाराष्ट्र

परभणी भाजपात पुन्हा अंतर्गत संघर्ष; गटनेते विश्वजित बुधवंत यांच्या नियुक्तीला स्थगिती

महानगरपालिकेतील भाजपाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नवनियुक्त गटनेते विश्वजित बुधवंत यांच्या नियुक्तीला विभागीय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे.

पुणे, महाराष्ट्र

NEET UG 2026 परीक्षेची नवीन तारीख जाहीर; 21 जूनला होणार परीक्षा

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली ‘नीट यूजी २०२६’ परीक्षा आता येत्या २१ जून २०२६ रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा National Testing Agency कडून करण्यात आली आहे.

MP Anand Paranjpe
पुणे

MP Anand Paranjpe : माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Pandharpur
पुणे

Pandharpur : पंढरीची वाट झाली सुखकर; पालखी मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण, वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि लिफ्टची सुविधा

विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या चार ते सहा महिन्यांत हे दोन्ही मार्ग भक्तांसाठी पूर्णतः खुले होतील,” अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गुरुवारी हडपसर ते दिवेघाट ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते फलटण येथे माध्यमांशी बोलत होते.

Sharad Pawar
पुणे

Sharad Pawar : इंधन बचतीत दिखावा नको, सातत्य हवे, शरद पवार यांची अपेक्षा

इंधन बचतीच्या मुद्द्यावर केवळ प्रतीकात्मक कृती करून उपयोग नाही, तर त्यात सातत्य आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची गंभीरता लक्षात घेणे आवश्यक असले, तरी त्यानंतर काही नेत्यांकडून होत असलेले प्रयत्न हा केवळ दिखावा असल्याची टीका त्यांनी केली.