Ladakh : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये हिंसक निदर्शने, चार जणांचा मृत्यू
लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी बुधवारी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली. विद्यार्थ्यांची पोलिस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली, यात चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले.











