Manoj Jarange : जेवढे नुकसान तेवढी मदत द्या. अन्यथा महाराष्ट्र बंद : मनोज जरांगे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : Manoj Jarange  सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी दिला आहे.Manoj Jarange

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव येथे भेट दिली. पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना म्हटले की, शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत. सरकारने तात्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के, 60 टक्के असे करू नका, असे आवाहन जरांगे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी सांगितलेManoj Jarange



 

पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी तर पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांच्या शेतांमध्ये तर कमरेएवढे पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने मदतीची याचना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Provide assistance as much as the damage is. Otherwise, Maharashtra will be shut down: Manoj Jarange’s warning

महत्वाच्या बातम्या