विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागातील विद्युतपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत. Ajit Pawar
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागातील विद्युत पुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ शेजारील जिल्ह्यांमधून मागविण्यात यावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत Ajit Pawar
दरम्यान, अजित पवार यांनी भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची जवळून पाहणी केली. गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. ते म्हणाले शेतकऱ्यांची शेतं, नुकसानग्रस्त घरं आणि उध्वस्त झालेला संसार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. यावेळी गावकऱ्यांना धीर देत आपलं सरकार शक्य त्या मार्गानं मदत करण्यासाठी ठोस पावलं उचलत आहे.
अजित पवार म्हणाले, पूरामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे याची जाणीव मला आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पिकांचे पंचनामे जलद गतीनं पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्या, असं देखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.
चिंचोली, गोरमळा आणि वालवड याठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली. शेतपिकं तसंच घरांचं झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यासोबतच वालवड येथील साठवण तलाव आणि आजूबाजूच्या शेतीचीही पाहणी करून तातडीनं आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे निर्देश अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. ते म्हणाले, माझ्या शेतकरी बांधवांच्या संकटाच्या काळात शासन ठामपणे त्यांच्या सोबत उभं आहे. मदतकार्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी खात्री देतो.
Ajit Pawar instructs the Managing Director of Mahavitaran
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!