Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Amit Satam : मुंबई महापालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, भाजपचे नूतन मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल

Amit Satam देशातील आजवरचा सर्वाधिक 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार 1997 ते 2022 या काळात मुंबई महापालिकेत झाला, असा हल्लाबाेल भारतीय जनता पक्षाचे नूतन मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. महापालिकेला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यास आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Manoj Jarange
महाराष्ट्र

पाच हजार पाण्याचे टँकर, हजार अँब्यूलन्स, मनाेज जरांगे यांची मुंबई माेर्चासाठी मराठा समाजाकडे मागणी

मुंबई माेर्चासाठी पाच हजारहून अधिक पाण्याचे टँकर, हजाराहून अधिक अँब्यूलन्स अशी तयारी करा. काेणीही नाेकरी, शेती, व्यवसायाचे कारण सांगू नका. सगळ्यांनी मुंबईवर तुटून पडा. फक्त तीन दिवस मला साथ द्या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.

महाराष्ट्र

Raj Thackeray निष्ठावंताची भाजप प्रवेशाची चर्चा, राज ठाकरेंनी थेट केली हकालपट्टी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांची साथ देणारे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यावर मनसेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हे आदेश काढले आहेत.

devendra fadnavis
मुंबई

Chief Minister Fadnavis:मुख्यमंत्री फडणवीस यांची नगर विकास मंत्रालयाच्या कामकाजावर नाराजी; उबाठा गटाला टीकेची संधी

Chief Minister Fadnavis:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास मंत्रालयाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर चुकांमुळे फडणवीस यांनी त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

devendra fadnavis
मुंबई

New liquor licenses:महाराष्ट्रात 328 नवे दारू परवाने; राजकीय नातेवाइकांच्या 96 परवान्यांवर वाद

New liquor licenses:आर्थिक ताण कमी करण्यासाठी आणि राज्याचा महसूल वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 41 मद्यनिर्मिती कंपन्यांना 328 नवीन परवाने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली असून, या निर्णयामुळे मद्य उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange:मनोज जरांगे यांच्या मागण्या समजून घेऊ देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया..

Manoj Jarange:जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून ‘चलो मुंबई’ मार्च सुरू होणार असून, याला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल, असा दावा जरांगे यांनी केला आहे. या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला असून, लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्त यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

देश-विदेश

रेड्डींनी सलवा जुडूम नाकारून आदिवासींचा स्वसंरक्षणाचा अधिकार रद्द केला, अमित शहा यांचा आराेप

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांनी सलवा जुडूम नाकारला आणि आदिवासींचा स्वसंरक्षणाचा अधिकार रद्द केला. म्हणूनच या देशात नक्षलवाद दोन दशकांहून अधिक काळ चालू राहिला.

Rohit Pawar, Sanjay Shirsat
महाराष्ट्र

Rohit Pawar : बारा हजार पानांचे पुरावे देत राेहित पवार यांची मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पाच हजार कोटी रुपयांची फाइल सहजपण फिरत असेल, तर याला भ्रष्टाचार म्हणू शकतो. बारा हजार पानांचे हे पुरावे आहेत. आमच्याकडे असलेला पेनड्राइव्ह पण तुमच्यापर्यंत देतो. तुम्ही हे पुरावे पाहणार आहात का? अशी विचारणा करत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Amit Satam
मुंबई

Amit Satam:महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक नेते अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा

Amit Satam:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक नेते अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray : शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले! रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटले आहे, ते सर्वांसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी आरोप केला की, “पहिल्या वर्षी ६०८० कोटींचा घोटाळा आणि दुसऱ्या वर्षी ६००० कोटींचा घोटाळा त्यांनी केला आहे.”

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : हिंदू धर्माबद्दल त्यांनी मस्ती करू नये, नितेश राणे यांचा सुप्रिया सुळे यांना इशारा

सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासारखं इतर धर्मासाठी असं काही बोलून किंवा करून दाखवावं. कारण दुसऱ्या धर्मासाठी अशी भाषणं केली तर चिरफाड होईल. त्यामुळे ही मस्ती फक्त आमच्या हिंदू धर्माबद्दल बोलताना होते. परंतु त्यांनी ही मस्ती करू नये, असा सूचक इशारा नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना दिला.

Girish Mahajan
मुंबई

Girish Mahajan : मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम , गिरीश महाजन यांची उध्दव ठाकरेंवर टीका

डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले किती लोक त्यामध्ये जेलमध्ये आहेत. कोरोना काळात मराठी माणसासाठी तुम्ही काय केले? असा सवाल करत मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.