Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

EVM
महाराष्ट्र

ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड अशक्यच, निवडणूक आयोगाचा दावा

निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असं भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे

Piyush Goyal
देश-विदेश

Piyush Goyal : भारत ‘डेड इकॉनॉमी’ नाही, तर जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, पियुष गोयल यांचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला “डेड इकॉनॉमी” (मृत अर्थव्यवस्था) म्हणत टीका केल्यानंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.”

Kailash Gorantyal
मुंबई

Kailash Gorantyal : काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का, माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुरुवारी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Dattatreya Bharane
महाराष्ट्र

Dattatreya Bharane मोबाइलवर रमी खेळणे भोवले, कोकाटेंकडे आता क्रीडा व युवक कल्याण तर दत्तात्रय भरणे नवी कृषी मंत्री

माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळणे भोवले असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडू, अजित पवार यांचे आश्वासन

सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे केंद्राकडे विनंती

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत त्यांनी विस्तृत पत्र पाठविले आहे.

Sadhvi Pragya Singh
देश-विदेश

Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप

भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल. मी संन्यासी आयुष्य जगले तरी देखील माझी बदनामी केली. माझ्या वरून भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली. मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले भावुक, महादेव मुंडे खून प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नसल्याचा दिला शब्द

विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

मुंबई

Chief Minister : भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार करण्याचे षडयंत्र, काँग्रेसने माफी मागावी, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Chief Minister : काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला.

पुणे

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना पुणे सत्र कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर म्हटले आहे.

Chandrasekhar Bawankule
महाराष्ट्र

बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राज्यातील बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स स्थापन करण्यात आले असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली