Eknath Khadse तुमच्यासारखे देवाभाऊंचे पाय मी चाटत नाही, एकनाथ खडसे यांची गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका
मी तुमच्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
मी तुमच्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारचे स्वागत केले आहे.
भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि यूकेच्या नॅशनल क्राइम एजन्सी (NCA) यांच्यात सामंजस्य करत झाला आहे. या कराराचा उद्देश आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार, मालमत्तेची जप्ती व परतफेड, तसेच भारतातून पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवणे हा आहे.
राज्यात सध्या मराठी आणि अमराठी वाद पुन्हा सुरु आहे. काही ठिकाणी या वादाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले आहे.या घटनेनंतर वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर संयमित तोडगा मांडला आहे.
माझा भाऊ चुकीच्या लोकांबरोबर गेला, हीच त्याची चूक आहे. या घटनेत माझा भाऊ असला, तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आम्ही कोणावरही दबाव टाकलेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्ट केले.
दौंड तालुक्यातील वाखारी इथल्या न्यू अंबिका या कला केंद्रात गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर मकोका लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा घरी होत असलेल्या सातत्यपूर्ण छळप्रकरणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
माझे काय चुकले? मी काय वाईट वागलो ते त्यांनी तिथे सांगावं. या सगळ्या गोष्टीचा जाब मी दादांनाच मुंबईला जाऊन विचारणार आहे, असे म्हणत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट निघाले आहेत
सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारसह या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपणार असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत घटक पक्षांमध्ये नाराजी आहे.
आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. लुटलं तर कर्जमाफी द्यावीच लागेल.