Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य ,सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे कान उपटले

बळीराजा संकटात असताना कृषि मंत्रिपदासारखे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील खाते असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले

मुंबई

मराठा द्वेषातून तटकरे यांनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर घडवून आणला हल्ला, मनोज जरांगे यांचा आरोप

मराठा द्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुणे

अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे, माधुरी मिसाळ यांच्या सूचना

कसबा मतदारसंघात स्वच्छतेच्या बाबतीत सुरू असलेले काम कौतुकास्पद असून फ्लेक्समुक्त कसबा तसेच शहर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : गुंडगिरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या मुसक्या आवळा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची मर्दुमकी दाखवणाऱ्यांनी निर्ल्लज कृषी मंत्री व गुंडगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Air India plane
मुंबई

Air India plane : एअर इंडियाच्या विमानांची अपघातांची मालिका सुरूच, धावपट्टीवरून घसरले विमान

अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट सुरूच आहे. सोमवारी विमान धावपट्टीवरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे.

Ajit Pawar
मुंबई

Ajit Pawar : सुरज चव्हाण यांना भोवली लातूरमधील मारहाण, राजीनामा देण्याचे अजित पवारांचे आदेश

लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केलेली मारहाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना चांगलीच भोवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई

Rohini Khadse : हनी ट्रॅप” प्रकरणावरून रोहिणी खडसे यांचा मेकअप क्वीन म्हणत रूपाली चाकणकरांना अप्रत्यक्ष टोला

Rohini Khadse : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले ‘हनी ट्रॅप’ प्रकरण आता अधिकच तापले असून, विरोधकांनी थेट भाजप सरकारला लक्ष केलं आहे.

2006 Mumbai local bomb blast case
मुंबई

2006 Mumbai local bomb blast case : २००६ मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरण: उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय; सर्व आरोपी निर्दोष मुक्त

२००६ साली मुंबईच्या पश्चिम उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने धक्कादायक निर्णय दिला आहे.

Ahmedabad plane crash
देश-विदेश

Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान अपघातात पायलटची चूक असल्याचे वृत्त खोटे , भारताचे परदेशी माध्यमांनाही संयम बाळगण्याचे आवाहन

अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात पायलटच्या चुकीचे वृत्त खोटे असल्याचे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले. घाईघाईत कोणताही निष्कर्ष काढू नये असा सल्ला देत नायडू यांनी परदेशी माध्यमांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : शिंदे गटाचा बडा मंत्री म्हणतो..उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात

राजकारणात काहीही होऊ शकते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास सहकारी असलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

महाराष्ट्र

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, पत्ते उधळले; छावा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी

लातूरमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रचंड राडा झाला. पत्ते उधळल्याने राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

देश-विदेश

Rahul Gandhi ऑपरेशन सिंदूरचा फटका बसल्याने गांधी कुटुंब पाकिस्तानपेक्षा जास्त त्रस्त, भाजपचा राहुल गांधींवर घणाघात

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा गांधी कुटुंबच अधिक वेदनेत दिसत आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रविवारी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केला आहे.