Ajit Pawar : दारू दुकानांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट
राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये, असा नियम आम्ही बनवला आहे.
राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये, असा नियम आम्ही बनवला आहे.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य करत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी नागपूर : “काही लोक जनसुरक्षा कायद्यातील एकही अक्षर न वाचता, त्याच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी जर विधेयक वाचले,
उत्तरपूर्व भारतात अशांतता निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गटांना लक्ष्य करत भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेलगत मोठी कारवाई केली आहे. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) या दहशतवादी संघटनेच्या छावणीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुमारे 100 ड्रोन वापरून अचूक हल्ला करण्यात आला. लष्कराच्या या ऑपरेशनमुळे ULFA च्या ढासळलेल्या नेटवर्कवर मोठा आघात झाला आहे.
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका करत थेट इशारा दिला आहे. “देवेंद्र पावले नसते, तर तुम्ही आत गेलाच असता.
डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी पसरविलेला भ्रम दूर करून रामजन्मभूमीच्या आंदोलनात मोठी भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी जैन यांना यांचा मोदी सरकारने राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करून सन्मान केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर विकासकामांना निधी मिळण्यास विलंब होत असल्याची खंत क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी केली आहे.
राज्यामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी लागू करण्यात यावी. यासाठी तसेच ठाकरे बंधूंच्या विरोधात आपण पुढच्या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करुन त्यांच्या तोंडावर काळे फासण्यात आले.
26/11 मुंबई हल्ला, 1993 बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्या आणि कोपर्डी बलात्कारासारख्या अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी विशेष वकील म्हणून ठसा उमठवणारे वरिष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे.