Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : नागरी सहकारी बँकांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

नागरी सहकारी बँकांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र व गुजरात राज्यात असून या बँकांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यातही नागरी सहकारी बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : भावनेच्या राजकारणात मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

राज्यात सध्या कथित हिंदी सक्तीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिकतेच्या राजकारणावर खंत व्यक्त करत मराठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. “भावनेच्या आहारी जाऊन आपण आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करत आहोत का?” असा मुद्दा त्यांनी मांडत वास्तवाचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.

देश-विदेश, महाराष्ट्र

Harshawardhan Sapkal : गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे.

महाराष्ट्र

Ashish Shelar काँग्रेसने आणले त्रिभाषा सूत्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मान्यता, आशिष शेलार यांचा दावा

काँग्रेसने 1965 च्या काळात पहिल्यांदा त्रिभाषा सूत्र आणले. त्यानंतर 1968 ला काँग्रेसच्या काळातील शासन निर्णय झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कारवाईची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाली.

Pratap Sarnaik
मुंबई

Pratap Sarnaik राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुनःश्च वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळ सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर उभारणार असुन त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले

filming devotees
पुणे

filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप अँप डाउनलोड करून मोबाईलचा ऍक्सेस घेत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवीत तरुण भक्ताना वेश्या किंवा प्रेयसीशी शारिरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता. आपला मोबाईल सारखा गरम का होत आहे हे तपासण्यासाठी बाबाच्या एका भक्ताने मोबाईलमध्ये तज्ञ् असणाऱ्या आपल्या मित्राला तो दाखविला. आणि त्या तज्ञ् असणाऱ्या मित्राच्या बाबाची ही गोष्ट लक्षात येणास वेळ लागलं नाही आणि बाबाच्या कृत्याचा सर्व उलगडा झाला. 

Supriya Sule
मुंबई

Supriya Sule : एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, सुप्रिया सुळे यांचा सरकारला सल्ला

एसएससी बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून विद्यार्थ्यांवर अनेक गोष्टी लादल्या जाताहेत. इतर कुठलेही राज्य या गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्र एवढी आग्रही भूमिका का घेतोय ? एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Keshav Upadhye
मुंबई

Keshav Upadhye : विरोधकांचे मराठीवर पुतना मावशीचे प्रेम, केशव उपाध्ये यांचा आरोप

विरोधकांचे मराठीवर पुतना मावशीचे प्रेम असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. मुंबईतील मराठी शाळा बंद पडल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे गटाला प्रश्न विचारले आहेत.

Shiv Sena
महाराष्ट्र

Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात संकेत देताच त्यांची तडकाफडकी महानगरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

मुंबई

मनसे मोर्चासाठी वापरणार गणेश मंडळे आणि दहीहंडी पथकांची ताकद

राज्यात त्रिभाषा सुत्राच्या माध्यमातून कथित हिंदी सक्ती 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गणेश मंडळे आणि दहीहंडी पथकांनी सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र

Minister Dada Bhuse : पीएम श्री शाळा धर्तीवर राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना ; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती

Minister Dada Bhuse : केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री आदर्श शाळा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. सीएम श्री शाळा योजने अंतर्गत जवळपास 5 हजार शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच 10 हजार शाळेतील “एक वर्ग आदर्श वर्ग” करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी कला, क्रीडा या विषयांना प्राधान्य द्यावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री आदर्श शाळा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. सीएम श्री शाळा योजने अंतर्गत जवळपास 5 हजार शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच 10 हजार शाळेतील “एक वर्ग आदर्श वर्ग” करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी कला, क्रीडा या विषयांना प्राधान्य द्यावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : कोणी कितीही आदळआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही, संजय राऊत यांचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कितीही आदळआपट केली किंवा तसे प्रयत्न केले तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही. 5 जुलै रोजी आम्ही एकत्र मोर्चा काढणार आहोत