Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

MNS
महाराष्ट्र

MNS : मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेची कलाकारांना धमकी

हिंदीच्या कथित सक्तीच्या विरोधात सुरुवसलेल्या आंदोलनात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धमक्याही सुरू केल्या आहेत. चित्रपटाचे शूटिंग रद्द करून मोर्चात सहभागी व्हावे अशी विनंतीच्या स्वरूपात धमकी दिली आहे.

मुंबई

माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग ; हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची घोषणा

राज्यात पहिलीपासून सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात आज आझाद मैदानातून रणशिंग फुंकण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाकडून आझाद मैदानात महायुती सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

Yugendra Pawar
पुणे

Yugendra Pawar अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारही अडकणार विवाहबंधनात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

Hindi compulsion
मुंबई

Hindi compulsion : मनसेच्या बॅनरवर भाजप मंत्र्याचा फोटो, हिंदी सक्तीवरून सरकारमध्ये मतभेद असल्याचा दावा

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुती सरकारमधील मंत्रीच हिंदी सक्तीच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या एका बॅनरची चर्चा सुरू असून यामध्ये भाजपाचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो वापरण्यात आला आहे.

Hindi compulsion in Pune
पुणे

Hindi compulsion in Pune : पुण्यात हिंदी सक्तीविरोधात बॅनरबाजी; ‘मराठी अस्तित्वाच्या लढ्यासाठी एकत्र या’ असा मराठी जनतेला साद

राज्यात हिंदी सक्तीविरोधात असंतोषाचा सूर अधिकच तीव्र होऊ लागला आहे. पुण्यातील पाषाण, सुसरोड आणि बाणेर परिसरात ‘मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी एकत्र या’ अशा आशयाचे बॅनर लावून हिंदी सक्तीला विरोध करण्यात आला आहे. 

Chandrakant Patil
मुंबई

Chandrakant Patil : मुंबईत दीड कोटी लोक अमराठी, त्यांच्याशी बोलताना हिंदी हवी की नको? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

देशामध्ये ५५ टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक आहेत. मुंबईत दीड कोटी लोक अमराठी आहेत. त्यांच्याशी बोलताना हिंदी हवी की नको? हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. इंग्रजी चालते, पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही, असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

student in Beed
महाराष्ट्र

student in Beed : बीडमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोन्ही शिक्षकांना बेड्या

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासत अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. शनिवारी मध्यरात्री बारा वाजता ही कारवाई बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरात केली.

देश-विदेश

Jagannath Rath Yatra पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू

ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथांच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सोन्याचा चम्मच तोंडात घेऊन मी जन्माला आलो नसलो, तरी मी जनतेला सोन्याचे दिवस दाखविले आहे. शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, तर सच्चा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

Aditya Thackeray
महाराष्ट्र

Aditya Thackeray हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार , आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा

राज्यात सध्या गाजत असलेल्या त्रिभाषा धोरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला आहे. हिंदी सक्तीचा जीआर आम्ही काढला नाही

पुणे

first Pasture Safari पुणे जिल्ह्यात सुरू झाली पहिली कुरण सफारी, चिंकारा, लांडगे, तरस, कोल्हे पाहता येणार

गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन कडबनवाडी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. या सफरीतून चिंकारा, लांडगे, तरस, कोल्हे पाहता येणार आहेत.

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : नागरी सहकारी बँकांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

नागरी सहकारी बँकांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र व गुजरात राज्यात असून या बँकांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यातही नागरी सहकारी बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.