Aditya Thackeray हिंदी सक्तीचा जीआर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार , आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सध्या गाजत असलेल्या त्रिभाषा धोरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला आहे. हिंदी सक्तीचा जीआर आम्ही काढला नाही, ती जबरदस्ती भाजपच्या सरकारने केली आहे. आमच्यावर आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करत जोपर्यंत हा जीआर मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे असा इशाराही त्यानी दिला. Aditya Thackeray

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. “भाजप सरकारने हिंदी सक्तीचा जीआर काढलेला आहे. त्या आधी आम्ही कधी असा निर्णय घेतला नाही. उलट आम्ही मराठी भाषेची सक्ती केली होती. मग आमच्यावर आरोप का?” असा सवाल त्यांनी केला.

गेल्या तीन वर्षांत दोन मुख्यमंत्री झालेत, पण दोष मात्र आम्हालाच दिला जातोय. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या मंत्र्यांमध्येच अंतर्गत संघर्ष आहे, ते झाकण्यासाठी या मुद्द्याचा वापर करत आहेत,”अशी टीका करताना त्यांनी ‘भ्रष्टनाथ शिंदे’ असा उल्लेख करून शिंदे गटालाही लक्ष्य केले.

भाजप सरकारमधील अंतर्गत वादाचे संकेत देत आदित्य म्हणाले, “शिंदेंना फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का, हेही पाहावं लागेल. सरकार झोपेत आहे की धुंदीत आहे? शिक्षण धोरणावर राजकारण न करता थोडा स्थिर आणि व्यावहारिक विचार करावा.”

शाळांमधील त्रिभाषा धोरणावर आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आमचा विरोध कोणत्याही भाषेला नाही. पण तुम्ही पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती करत आहात, त्याला आमचा विरोध आहे. हे लादणे आहे. हे सरकार शिक्षणाच्या नावाखाली जबरदस्ती करत आहे.

तसेच सध्याच्या ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेतील अडचणींवरही त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.१३ मे रोजी दहावीचा निकाल लागला. त्यानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, पण वेबसाइट कोलमडली, ओटीपी येत नाही, फार्म भरताना अडचणी येत आहेत. प्रवेश यादीही लागलेली नाही. २५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे आणि सरकार पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर युवासेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.

The agitation will continue until the Hindi compulsory GR is withdrawn, Aditya Thackeray warns the government

महत्वाच्या बातम्या