Sanjay Raut : कोणी कितीही आदळआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही, संजय राऊत यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कितीही आदळआपट केली किंवा तसे प्रयत्न केले तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही. 5 जुलै रोजी आम्ही एकत्र मोर्चा काढणार आहोत, मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र करणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. Sanjay Raut

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, हा मोर्चा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून मोठा विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. या मोर्चा बद्दल सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल. तसेच या मोर्चात शरद पवार यांनी देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि इतर अनेक छोटे पक्ष देखील यात सहभागी होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut

मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. यावर राऊत म्हणाले, पूर्वी हे सर्व नेते एकमेकांना भेटत नव्हते, भेटायचे टाळत होते किंवा रस्ते देखील बदलत होते. आता हे सर्व एकत्र भेटत आहेत. एकमेकांसोबत चहा पीत आहेत, एकत्र गप्पा मारतानाचे व्हिडिओ समोर येत आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत हे सर्व एकत्र येतील, अशी आमची सर्वांची भूमिका आहे.



मुंबई महानगरपालिकेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवला होता. तशीच आमची सर्वांची भूमिका आहे. सर्व मराठी माणसाने एकत्र येऊन निवडणूक लढवाव्यात, ही भूमिका अनेकदा आम्ही जाहीर केली आहे. राज ठाकरे आणि देखील तशी भूमिका जाहीर केली आहे. उद्याचा मोर्चा संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चांगले वातावरण निर्माण होईल आणि त्यातून आम्हाला खात्री आहे, की नक्कीच चांगले होईल. अर्थात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी कितीही आपटा आपट केली तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोर्चाला बदनाम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या बाबत चुकीचे विधान करता असून त्यांचे विधान पूर्णपणे गैरसमज पसरवणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एखादा निर्णय केंद्र सरकारने राज्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर त्याविषयी अभ्यास करण्यासाठी समिती नेमणे गुन्हा आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलेले नाही. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तयार केलेले आहे. त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींची समिती स्थापन करणे म्हणजे, निर्णय स्विकारणे होत नाही. प्रत्येक अहवाल मुख्यमंत्री स्विकारत असतात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याचा जी-आर उद्धव ठाकरे यांनी नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी काढला असल्याचे राऊत म्हणाले.

No matter how much anyone clashes, the unity of the Marathi people will not be broken, claims Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या