Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut : राज – उध्दव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत यांनी मांडली ही भूमिका

हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगवेगळे मोर्चे काढण्याची घोषणा केली. आधी उद्धव ठाकरे यांनी 7 जुलैला तर त्यानंतर राज ठाकरे यांनी 5 जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेत केली. मात्र आता दोघा भावांचा एकत्रित मोर्चा निघण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे सूचक ट्विट केले.

sharad pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : हिंदीसक्तीच्या विरोधातील मोर्चात सहभागी होण्याबाबत शरद पवार म्हणाले…

हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर मोर्चात सहभागी होणार का याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रमाची भूमिका कायम ठेवली आहे. कोणीही सांगतो तुम्ही यात सहभागी व्हा, अशी भूमिका घेता येणार नाही. पण त्यांचा मुद्दा जर महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणे आणि मग त्यावर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : हिंदी विरोधावरून शरद पवारांचा ठाकरे बंधूंना सबुरीचा सल्ला

देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना दिला आहे .

Harshwardhan Sapkal
मुंबई

Harshwardhan Sapkal : इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली व मतचोरी न करता निवडणुकाही घेतल्या, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला

इंदिरा गांधी यांनी १९७५ साली तत्कालीन परिस्थितीमुळे आणीबाणीचा निर्णय घेतला होता. या आणीबाणीचे समर्थन विनोबा भावे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही समर्थन केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिराजी गांधी यांना त्यावेळी दोन पत्रे लिहिले होती, त्यात घालीन लोटांगण…हाच प्रकार आहे. ती पत्रे का लिहिली होती, हेही तपासले पाहिजे, असे म्हणत आणीबाणीत काही प्रशासकीय चुका झाल्या पण काही इष्टही झाले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Nitin Gadkari
मुंबई

Nitin Gadkari : दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या, नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दुचीकीवरील टोलच्या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, काही प्रसारमाध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. परंतु असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही.

Sharad Pawar
पुणे

Sharad Pawar आमची झोप उडाली, आता आमच कसं व्हायचं? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचा प्रश्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमच कसं व्हायचं? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार केला.

Manohar Lal Khattar
देश-विदेश

Manohar Lal Khattar : बिहारमध्ये केंद्र सरकार उभारणार अणुऊर्जा प्रकल्प; निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी घोषणा

बिहारमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची केंद्र सरकारची पूर्णपणे तयारी असल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी पाटण्यात एका केली. भारत सरकार संपूर्ण देशभरात सहा अणुऊर्जा केंद्रे (Small Modular Reactors (SMRs) स्थापन करणार आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता हिंदी सक्तीचा प्रस्ताव, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते. डॉ. माशेलकर समितीचा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता. मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील शिवसेना ठाकरे गटाकडूनजाणीवपूर्वक हिंदी भाषेवरून राजकारण केले जात आहे, असा गौप्यस्फोट उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मुंबई

Devendra Fadnavis : वित्त विभागाचा शक्तिपीठावर आक्षेप नाही, अजित पवारांचा विरोध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

Devendra Fadnavis : वित्त विभागाने शक्तिपीठावर कोणताही आक्षेप घेतला नाही. वित्त विभागाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यामुळे वित्त विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Medha Kulkarni
महाराष्ट्र

Medha Kulkarni : कोथरूडच्या बाई असा बॅनर लावून खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी, पोलिसांकडून गुन्हा दाखल

कोथरूडच्या बाई अशा आशयाचा खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणारा एक बॅनर बालगंधर्व रंगमंदिर चाैकात लावण्यास येऊन त्यावर वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आराेपी विराेधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray
महाराष्ट्र

Raj Thackeray : हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मनसेचा मोर्चा, राज ठाकरे यांची घोषणा

महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई

Bhaskar Jadhav : वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ, भास्कर जाधव यांनी कोणाला दिला सल्ला ?

Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे काही दिवसांपासून नाराज असणारे नेते भास्कर जाधव यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मी नाराज नाही, हे माध्यमांसमोर वारंवार सांगताना भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर ‘वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते, असे म्हटले आहे.