Bhaskar Jadhav : वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ, भास्कर जाधव यांनी कोणाला दिला सल्ला ?
Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे काही दिवसांपासून नाराज असणारे नेते भास्कर जाधव यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मी नाराज नाही, हे माध्यमांसमोर वारंवार सांगताना भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर ‘वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते, असे म्हटले आहे.











