Sharad Pawar : सरकारच्या विरोधात बातमी देणाऱ्या पत्रकारांना धमकी, शरद पवार यांचा सरकारवर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad Pawar  जे वृत्तपत्र त्यांचं स्वच्छ मत मांडत आहेत आणि सरकारच्या विरोधात आहेत, अशा वृत्तपत्रांना किंवा तेथील पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन जातो. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी अशी छापू नका. एक प्रकारची धमकी पत्रकारांना दिली जात आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यामुळे अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक असा सवाल केला आहे.Sharad Pawar

मुंबईतील दादर येथे आज वेगवेगळ्या कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आणीबाणीसाठी इंदिरा गांधींना दोष दिला जातो, हे सर्व खरं आहे. पण पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशाची माफी मागितली होती, ही गोष्ट विसरता कामा नये. त्यामुळे नंतरच्या काळात पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली आणि चित्र बदललं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे,

शरद पवार म्हणाले की, जे वृत्तपत्रात काम करतात त्यांना माहीत असेल, परंतु बाकीच्यांना माहीत नाही. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मांडत आहेत. परंतु जे वृत्तपत्र त्यांचं स्वच्छ मत मांडत आहेत आणि सरकारच्या विरोधात आहेत, अशा वृत्तपत्रांना किंवा तेथील पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन जातो. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी अशी छापू नका. एक प्रकारची धमकी पत्रकारांना दिली जात आहे. त्यामुळे अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे? याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. यासाठी आम्ही वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली आणि एकच हाहाकार माजला होता. देशावर लादण्यात आलेल्या या आणीबाणीला आज (25 जून) 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरून भाजपाकडून काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेतेमंडळींवर निशाणा साधण्यात येतो. आणीबाणीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

Sharad Pawar accuses government of threatening journalists who report against the government

महत्वाच्या बातम्या