CBSE 10th board आता सीबीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा निर्णय घेत २०२६ पासून १०वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यास मान्यता दिली आहे. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी यासंदर्भात माहिती दिली. CBSE 10th board

नवीन पद्धतीनुसार, पहिला  टप्पा फेब्रुवारी महिन्यात तर दुसरा टप्पा मे महिन्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असेल, तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पर्यायी असेल. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे अंतरिम मूल्यांकन केवळ एकदाच होईल.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या टप्प्यात कमी गुण मिळाले, तर दुसऱ्या टप्प्यात परीक्षा देऊन चांगली कामगिरी करता येईल. अंतिम गुणपत्रिका विद्यार्थ्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल.

हा निर्णय केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीनुसार घेतला आहे. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांवरील परीक्षा दडपण कमी करणे आणि त्यांना चुका सुधारण्यासाठी दुसरी संधी देणे हा आहे. बोर्डाच्या मते, एखाद्या विद्यार्थ्याच्या ज्ञान आणि कौशल्याचे संपूर्ण मूल्यांकन एका परीक्षेवर आधारित करता येत नाही. त्यामुळेच या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी २०२६ पासून होणार आहे.

Now CBSE 10th board exams are conducted twice a year

महत्वाच्या बातम्या