Air India Flights : एअर इंडियाचे आठ विमान उड्डाणे रद्द, तांत्रिक बिघाड, हवामान आणि हवाई निर्बंधांमुळे निर्णय
अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेत असलेल्या एअर इंडिया एअरलाइन्सने आठ विमानांचे उड्डाण रद्द केल्याने देशातील अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये चार आंतरराष्ट्रीय आणि चार देशांतर्गत फ्लाइट्सचा समावेश आहे. विमानांची तांत्रिक तपासणी, खराब हवामान आणि काही हवाई क्षेत्रांवर लागू करण्यात आलेले निर्बंध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने अधिकृत निवेदनातून स्पष्ट केले आहे.











