Sanjay Shirsat : मातोश्रीवर बंगाली बाबाचा दररोज वावर, उद्धव ठाकरेंवर संजय शिरसाट यांचा थेट हल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटावर पुन्हा एकदा जोरदार पलटवार करत मातोश्रीवर दररोज एका बंगाली बाबाचा वावर असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. “तो बाबा रोज येतो, काय करायचं आणि काय नाही, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगतो,” असा आरोप त्यांनी केला आहे.



पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांचा अघोरी पूजेसंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही तोच व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून शिंदे गटावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, “अघोरी पूजा कधीही कॅमेऱ्यासमोर होत नाही, ती जंगलात किंवा बंद खोलीत होते. त्यामुळे भरत गोगावले यांच्यावर केलेले आरोप म्हणजे केवळ मदारीचे खेळ असल्याचे ते म्हणाले.

मातोश्रीवर रोज येणारा बंगाली बाबा कोण आहे? त्या बाबतची माहिती संजय राऊत यांनी देणे आवश्यक आहे. माध्यमांनी देखील हे बाबा कोण आहेत, हे शोधावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिरसाट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्व पुढे नेत आहोत. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला काँग्रेसकडे झुकवले आहे. त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका आठवत नाहीत. याउलट एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळेच आमच्या गटात प्रवेश घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या आहेत.

शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सध्या कुठलाही संवाद नाही. त्यामुळे युती होण्याची शक्यता सध्या तरी नाही. मात्र, एकनाथ शिंदे आधीच राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित भविष्यात काहीतरी सकारात्मक घडू शकते,”

Bengali Baba’s daily activities on Matoshree, Sanjay Shirsat’s direct attack on Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या