Raj Thackeray मनसे कार्यकर्त्यांकडून धमक्या, सदावर्ते म्हणाले राज ठाकरेंना सुधारायला सांगा…

विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असा सल्ला सदावर्ते यांनी धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला दिला. Raj Thackeray

सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर मनसे कार्यकर्त्याकडून गुणरत्न सदावर्ते यांना धमकी देण्यात आली आहे. याची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. Raj Thackeray

मनसे कार्यकर्त्यानं गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलं कोण बोलतय? सदावर्ते यांच्या या प्रश्नावर मी राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक बोलतोय असं सांगण्यात आलं. त्यानंतर तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कशाला देता? असा सवाल सदावर्ते यांना करण्यात आला.



या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी सांगितलं की, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. तीन भाषा शिकवण्याचा अधिकार आहे. मला सांगा जर तीन भाष शिकण्याचा अधिकार असल्यानंतर आपण लोकांच्या पोरांना खिशातल्या पैशांनी शिकवतो का ओ?

त्यानंतर मनसेच्या कार्यकर्यानं गुणरत्न सदावर्ते यांना धमकी दिली. तुमच्या घरावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल, उद्या जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर गाडीची काच फोडली जाईल हे लक्षात ठेवा, असं मनसे कार्यकर्यानं सदावर्ते यांना म्हटलं. दरम्यान त्यानंतर सदावर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले. मला हल्ल्याची भीती वाटत नाही, तुम्ही अशा धमक्या मला देऊ नका, राज ठाकरे यांना सुधारायला सांगा, असा सल्ला सदावर्ते यांनी या मनसेच्या कार्यकर्त्याला दिला.

दोन महिन्यांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदीच्या सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राज ठाकरे स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी हिंदीला विरोध करून भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे कृत्य गुन्हेगारी संहितेत बसणारे आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Threats from MNS workers, Sadavarte said, tell Raj Thackeray to improve…

महत्वाच्या बातम्या