Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

NEET exam
देश-विदेश

NEET Exam : नीट परीक्षेत दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी

नॅशलन टेस्टींग एजन्सीने (NTA) वैद्यकीय पदवीसाठी घेतलेल्या NEET UG 2025 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

plane crash
देश-विदेश

Plane crash : विमान अपघाताचा व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला खरेच अटक केली? अहमदाबाद पोलिसांनी दिले हे स्पष्टीकरण

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या AI-171 या एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ सर्वप्रथम रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे.

Air India
देश-विदेश

Air India : अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना एअर इंडियाकडून अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (AI-171) विमानाच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी व जमिनीवर मृत्यूमुखी नागरिकांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी एअर इंडियाने प्रत्येकी २५ लाख रुपयांची तात्पुरती अंतरिम मदत जाहीर केली आहे. ही मदत टाटा सन्सकडून आधीच जाहीर करण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त असेल. अपघातातून वाचलेल्या एकमेव प्रवाशालाही हीच मदत दिली जाणार आहे.

Naxalites
देश-विदेश

Naxalites : बालाघाटमध्ये चकमकीत ४ नक्षलवाद्यांचा खात्मा, रॉकेट लाँचरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील पचामा या डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. चकमकीनंतर घटनास्थळी स्फोटके, रॉकेट लाँचर, रायफल व काडतुसांचा मोठा साठा सापडला असल्याची माहिती विशेष पोलिस महासंचालक (नक्षलवाद विरोधी पथक)पंकज श्रीवास्तव यांनी दिली.

Ashadhi Wari
पुणे

Ashadhi Wari : आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान

आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

Bachchu Kadu,
महाराष्ट्र

Bachchu Kadu, : आता आरपारची लढाई,बच्चू कडू यांच्या बरोबरच राजू शेट्टी यांचाही इशारा

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपोषण आंदोलन मागे घेताना 2 ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच कर्ज गोठवा आणि नवीन कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा करा. कर्जमुक्ती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे.लाडकी बहिण योजना जाहीर करताना कोणता अभ्यास केला होता? सिंचन घोटाळ्याच्या गाडीभर फाईल दिल्या, तेव्हा त्यातून काय निष्पन्न झालं? अनेक घोटाळे तुमच्या कडे पाठविले, मात्र तुमचा अभ्यास कधी दिसलाच नाही. अभ्यास करून दिलेल्या कर्जमुक्तीचं काय वाटोळं झालं तेही जगाला माहिती आहे.

महाराष्ट्र

Aditi Tatkare आदिती तटकरे यांनी जागविल्या विमान अपघातात मृत्युमुखी अपर्णा वहिनींच्या आठवणी

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचेही निधन झाले.

Bachchu Kadu
मुंबई

Bachchu Kadu : बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित, उदय सामंत यांच्या विनंतीला मान

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

Ajit Pawar told Bachchu Kadu
महाराष्ट्र

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता, अजित पवारांनी बच्चू कडू यांना सुनावले

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता आहे. बच्चू कडू यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आता राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकारच्या वतीने करू असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

B.J. Medical College
देश-विदेश

B.J. Medical College : विमान पडल्याने बी.जे. मेडिकल कॉलेजमधील मृत्युमुखी पडलेल्यांनाही टाटा समूह करणार एक कोटी रुपयांची मदत

अहमदाबादमध्ये एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात मृतांचा आकडा शनिवारी २७४ वर गेला असून, यामध्ये विमानातील २४१ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजमधील ३३ जणांचाही त्यात समावेश आहे. टाटा समुहाकडून विमान पडून जमिनीवर मृत झालेल्यानाही एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

पुणे

Prahar Sanghatana activists : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राडा

Prahar Sanghatana activists :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. अजित पवारांसमोरच गोंधळ घातला. कार्यक्रमस्थळी असलेल्या पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘बच्चू कडूंना न्याय द्या’ अशा शब्दांत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : सरकारने निर्णय जाहीर केला नाही तर १६ तारखेपासून पाणीत्याग, बच्चू कडू यांचा इशारा

सरकारकडून कर्जमाफीबाबत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे. सरकरने निर्णय जाहीर केला नाही तर १६ तारखेपासून पाणीत्याग करून आम्ही आंदोलन करू, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.