Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ahmedabad plane crash
मुंबई

Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथील विमान अपघात सायबर हल्ल्याने, संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका

अहमदाबाद येथील विमान अपघात सायबर हल्ल्याने झाला का अशी भीती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. अपघात अहमदाबाद येथेच कसा झाला? या विमानतळाची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला.

ashish shelar
मुंबई

Ashish Shelar : भाजपमधील वाद चव्हाट्यावर, आशिष शेलार यांच्यासमोरच कार्यकर्ते भिडले

महापालिका निवडणुका तोंडावर असताना मुंबईत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. कांदिवली येथे भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. या बैठकीपूर्वीच भाजपच्या दोन गटात राडा झाला. आशिष शेलार यांच्या समोरच दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कांदिवली पूर्वच्या जानुपाडा येथे हा प्रकार घडला आहे.

Helicopter Manufacturing Factory
मुंबई

Helicopter Manufacturing Factory : नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना

नागपुरात ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला. मॅक्स एरोस्पेस कंपनी हा कारखाना उभारणार असून २०२६ पासून कामाला सुरुवात होणार आहे.

Shambhuraje Desai
महाराष्ट्र

Shambhuraje Desai : पाटणकरांच्या भाजप प्रवेशामुळे शंभूराजे देसाई यांचा तिळपापड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

पाटण विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे गटाचे आणि मंत्री शंभूराज देसाई यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. मी या पक्ष प्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Charanseva
पुणे

Charanseva मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे वारकऱ्यांची ‘चरणसेवा’

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Narendra Modi
देश-विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली विमान अपघात स्थळाला भेट, जखमींची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे विमान अपघात स्थळाला भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. सिव्हिल रुग्णालयात गेले अपघातात जखमी झालेल्यांची त्यांनी विचारपूस केली.

Air India plane crash
पुणे

Air India plane crash पिंपरी चिंचवड येथील इरफान शेख याचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू

पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर येथील इरफान शेख या तरुणाचा वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला.

महाराष्ट्र

Bachchu Kadu : बच्चू कडू यांची प्रकृती खालावली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

Bachchu Kadu :सर्वसामान्यांचे सरकार असे संबोधन महायुतीचे सरकार नेहमी करते. मग बच्चू कडू (Bachchu Kadu) हे वेगळ्या लोकांसाठी आंदोलन करीत आहेत काय? त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत काय? कर्जमाफीच्या आश्वासनावर चर्चा का करीत नाही? बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati )यांनी दिला.

Shani Shingnapur
महाराष्ट्र

Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किंमतीत स्वीकारू शकत नाही. कोणत्याही मुस्लिम संस्थेत तुम्हाला कोणताही हिंदू काम करताना दिसणार नाही

महाराष्ट्र

Sanjay Shirsat : इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना वादग्रस्त वक्तव्य

संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Raut questions Amit Shah
मुंबई

Sanjay Raut : विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊत यांचा अमित शाह यांना सवाल

आधी पहलगाममध्ये नागरिकांवर झालेला हल्ला, मुंबईतील रेल्वे अपघात आणि आता अहमदाबादमध्ये झालेला विमान अपघात या घटनांची जबाबदारी कोण घेणार

Air India flight
देश-विदेश

फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग, सर्व १५६ प्रवासी सुखरूप

थायलंडमधील फुकेत शहरातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या AI-379 या विमानाला गुरुवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.