Ahmedabad Plane Crash : विमान अपघात की घातपात? दोन्ही इंजिन बंद पडली, 625 फूटवरच विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला AI171 विमान अपघात आता केवळ तांत्रिक बिघाड नसून एक पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा संशय अधिकच बळावत आहे. कारण, जे घडलं ते फक्त अपघात म्हणता येणार नाही हे एक विचारपूर्वक घडवलेलं कारस्थान असण्याची शक्यता तांत्रिक तपशीलांमधून पुढे येत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे.











