Raju Shetti : मंत्र्यांना भरसभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही, राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आव्हान

विशेष प्रतिनिधी

अमरावती : माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, बच्चू कडू (Bachchu Kadu) इथे उपोषणाला बसले आहेत. इथे या मंडपात नाही आलात तरी चालेल. पण आज या क्षणापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे मंत्री पोलिसांचा ताफा घेऊन फिरतील. त्या मंत्र्यांना भरसभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी शेतकऱ्यांना केले आहे.



गेल्या पाच दिवसापासून बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. राजू शेट्टी यांनी कडू यांची भेट घेतली. ते म्हणाले, राज्यामध्ये दररोज ८ शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत यामुळे महाराष्ट्र राज्य शेतक-यांची स्मशानभुमी झाली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पाळावे अन्यथा शनिवारी संपुर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. शनिवारी चक्काजाम आंदोलनानंतर पुढील तीव्र आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

राज्यातील मंत्री जिल्ह्याच्या दौ-यावर असताना त्यांच्या गाड्या अडवून याबाबत त्यांना जाब विचारण्याचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आला. दरम्यान राज्यातील सर्व संघटनांचे शेतकरी नेते , मनोज जरांगे पाटील त्याबरोबरच विविध सामाजिक पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून येत्या दोन दिवसात आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

“Ministers Must Be Beaten in Public Assemblies to Make Them Listen: Raju Shetti Challenges Farmers”

महत्वाच्या बातम्या