एअर इंडियाचे विमान कोसळले; अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना
गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला.
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. मात्र वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. त्याचे कारण सांगणारे पत्र त्यांनी मनसैनिकांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “आभारी आहे, असे पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे.
प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा मृत्यू झाला असून, सरकारने केवळ ३७ मृत्यूंचीच अधिकृत नोंद केली आहे, असा दावा एका बीबीसी या वृत्तवाहिनीने केला आहे.
मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणवर कुठलीही स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्याना आर्थिक दुर्बल घटकातून ( एसईबीसी) प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुढ़ील सुनावणी पुढील महिन्यत 18-19 जुलैला होणार आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यातील जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच तो रद्द केल्याने काँग्रेसचा सामाजिक न्यायाचा दावा धुळीस मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जातनिहाय सर्वेक्षण व्यवस्थित न केल्याचा आरोप केला होता, आणि त्यानंतरच त्यांच्या स्वतःच्या पक्षाने राज्यात केलेला सर्वे रद्द केला आहे.
भारताची दहशतवादाविरुद्ध लढाई केवळ दोन देशांमधील प्रश्न आहे. जागतिक पातळीवरील दहशतवादाविरुद्धचा लढा आहे. आज दुर्लक्ष केले तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची उद्या तुमच्याही मानगुटीवर बसेल असा इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यात निधी वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे
पोलिसांवर खोटे आरोप करण्याची सवय असणाऱ्यांना आता सावध राहावे लागणार आहे. पोलीस दलाची प्रतिमा बदनाम मलिन करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होऊ लागली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने राज्यात पेरणी व लागणीची लगबग सुरू असताना शेतकरी खताची खरेदी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. राज्यामध्ये युरीया , डी. ए. पी. व इतर खतांची टंचाई भासवून सर्रास लिंकींग केले जात आहे
विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही.