एअर इंडियाचे विमान कोसळले; अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात जवळपास १५० प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी आहे. अपघातस्थळावरून आकाशात काळे धूराचे लोट जाताना दिसत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.

Plane crash in Ahmedabad Air India plane crashes

महत्वाच्या बातम्या