Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा
अजित पवार यांनी आंदोलनावर जी भूमिका मांडली, ती लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या स्थानाला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने आंदोलने जर केली नाहीत, तर सत्ताधारी माजतील. राज्य-देश लुटतील. महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील. जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही,” अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.











