Laxman Hake’ : माझ्या केसाला जरी धक्का लागला तर पवार कुटुंबीय जबाबदार, लक्ष्मण हाके यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

पुणे : Laxman Hake मला रोज महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे धमक्या मिळू लागल्या आहेत. मी गावगाड्यातील मेंढपाळाचा पोरगा आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही. मात्र माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.Laxman Hake

हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी तसेच आमदारांनी हाकेंवर पलटवार केला. आमदार अमाेल मिटकरी यांच्याशी त्यांचा चांगलाच वाद झाला हाेता. आता आज देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, अजितदादा तुमच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घाला. जर माझ्या केसाला धक्का लागला तर तुम्हाला रस्त्यावर आणू. मी गोरगरीब ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असून अर्थ खात्याला गोचीडासारखा चिटकून बसलेला अजित पवार हा ओबीसी समाजाचा निधी देत नसल्याने माझा त्यांच्याशी वाद आहे.

ओबीसी समाजाचा अडवलेला निधी देण्याऐवजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागपूर पासून पंढरपूर पर्यंत ज्या पद्धतीने धमक्या येऊ लागल्या आहेत ते पाहता माझ्यावर असा हल्ला झाल्यास या संपूर्ण पवार कुटुंब जबाबदार असेल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

If anything bad happens to me, Pawar family is responsible, Laxman Hake’s accusation

महत्वाच्या बातम्या