Israel launches Major Attack on Iran : इस्रायलने इराणवर मोठा हल्ला, सहा लष्करी तळ लक्ष्य, लष्करी अधिकाऱ्यांसह दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ ठार

विशेष प्रतिनिधी

तेहरान : इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला असून इस्रायली सैन्याने तेहरानभोवती असलेल्या किमान ६ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या ६ पैकी ४ ठिकाणी अणु तळ देखील आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर हुसेन सलामी इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. Israel launches Major Attack on Iran

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हल्ला केल्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी सकाळी शत्रू देशावर हल्ला केला.अल-जझीराच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणचे दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ, मोहम्मद मेहदी तेहरानची आणि फेरेदून अब्बासी यांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी, इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि काही वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे की- इराणमध्ये आपल्याला हानी पोहोचवण्याची प्रचंड क्षमता आहे. आम्ही यासाठीही तयारी केली आहे. पुढील काही दिवस मी इस्रायली नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो. दरम्यान, इस्रायली सैन्याने शुक्रवारी रात्री स्थानिक वेळेनुसार पहाटे ३ वाजता घोषणा केली की देशभरातील शाळा बंद राहतील, गर्दी जमण्यास मनाई असेल. अत्यावश्यक कार्यालये वगळता सर्व कार्यालये बंद राहतील. जेरुसलेममध्ये सायरन वाजत असताना १०० हून अधिक लोक भूमिगत पार्किंगमध्ये लपून बसले आहेत.

इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. Israel launches Major Attack on Iran

Israel launches major attack on Iran, targeting six military bases, killing two top nuclear scientists along with military officers

महत्वाच्या बातम्या