Sanjay Shirsat : इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना वादग्रस्त वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sanjay Shirsat

गुरुवारी रात्री लक्ष्मण हिवराळे (46, रा. क्रांतिनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिरसाट यांच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. च औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे.



पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील पुरावे घेऊन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. जलील यांच्या विनंतीनंतर दानवे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासनही दिले. पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधातील व्हिट्स हॉटेल, एमआयडीसी मधील जागा, मागासवर्गीय शेतकऱ्यांकडून केलेला व्यवहार, मुंबई व छत्रपती संभाजीनगरातील घर आदींसंबंधी कागदपत्रे इम्तियाज यांनी दानवेंच्या स्वाधीन केली.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर शेंद्रा एमआयडीसीमधील 6 कोटी रुपये किमतीची जागा नियम डावलून मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे. जलील यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर ताशेरे ओढले. “शिरसाट यांनी त्यांच्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, त्यांनी सुरू करायच्या कंपनीसाठी दारू तयार करण्यास लागणारे काही केमिकल्स लागणार आहेत. पण कंपनी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांमध्ये मात्र वेगळेच फूड प्रॉडक्ट्स दाखवले आहेत,” असा दावा त्यांनी केला. शिरसाट यांनी जी कागदपत्रे सादर केली आहे त्यामध्ये काही तरी गोंधळ आहे. स्पिरिट किंवा अल्कोहोल फूड प्रॉडक्टमध्ये कुठे आणि कसे वापरले जाते, हे समजत नाही. हे दस्तऐवजांतील माहितीमध्ये गोंधळ स्पष्टपणे दिसतो, असेही जलील यांनी म्हटले होते.

Atrocity case registered against Imtiaz Jaleel, controversial statement while accusing Sanjay Shirsat

महत्वाच्या बातम्या