NEET Exam : नीट परीक्षेत दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नॅशलन टेस्टींग एजन्सीने (NTA) वैद्यकीय पदवीसाठी घेतलेल्या NEET UG 2025 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल NTAच्या वेबसाईट neet.nta.nic.in वर पाहाता येणार आहे. नीट युजी अंतिम आन्सर की जारी करण्यात आली आहे. या परीक्षेत राजस्थान येथील महेश कुमार प्रथम, मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधीया द्वितीय तर महाराष्ट्रातील कृषांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये केवळ एका विद्यार्थीनीला स्थान मिळाले आहे. दिल्लीची अविका अग्रवाल हिला पहिल्या पाचात स्थान मिळाले. NEET exam



यंदाच्या टॉपर लिस्टमध्ये पहिल्या 10 मध्ये केवळ एका विद्यार्थींनीला स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या मृणाल किशोर झा, हर्ष केडावत, आणि आशी सिंह या विद्यार्थ्यांना देखील टॉप 10 मध्ये जागा मिळाली आहे. तर गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांची दखल घ्यायला लावली आहे. राजस्थानच्या तनय याला 13वी रँक मिळाली आहे. हा इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) एकमात्र विद्यार्थी टॉप 20 मध्ये आला आहे.

रँक 14 ते 20 च्या दरम्यान राजस्थानचे आणखी तीन विद्यार्थी आहेत. त्यात सोम्या शर्मा, मानवेन्द्र सिंह राजपुरोहित यांचा समावेश आहे, पश्चिम बंगालचे रचित सिन्हा चौधुरी आणि रूपायन पाल, कर्नाटकचा निखिल सॉनाड, तेलंगानाच्या काकर्ला जीवन साई कुमार, आणि आंध्र प्रदेशातील दर्भा कार्तिक राम कीरेटी यांनी देखील टॉप 20 मध्ये स्थान मिळाले आहे.

Students from Delhi, Rajasthan and Maharashtra excel in NEET exam

महत्वाच्या बातम्या