Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

MNS-Thackeray
मुंबई

MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे म्हणाले, त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, दोन भावांनी बोललं पाहिजे

दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी माणसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चेवर दिली आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्यात आम्हाला काही प्रश्न नाही असेही ते म्हणाले.

Raju Shetty
पुणे

Raju Shetty : राजू शेट्टी यांनी समोर आणला जालिंदर सुपेकर यांचा आणखी एक कारनामा, अमिताभ गुप्ता यांच्या सोबत पाच कोटी रुपयांच्या खरेदीत गैरव्यवहार

वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी नाव समोर आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक ( आयजी) जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मिळून पाच कोटी रुपयांच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

Maharashtra Weather Update:
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्हे तसेच घाटमाथ्यावर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Sudhakar Badgujar
महाराष्ट्र

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर ना घरके, ना घाटके, भाजपमध्ये घेण्यास आमदार हिरेंचा तीव्र विरोध

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आज सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र आमदार सीमा हिरे यांनी त्यांना तीव्र विरोध केल्याने ना घरके, ना घाटके अशी त्यांची अवस्था झाली आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘ हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : मंत्रालय आणि विधिमंडळ अदानीला कधी देणार आहात ? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

सध्या सत्तेत असलेले भाजप महायुतीचे सरकार हे सामान्य जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसते आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन देखील दिली आहे,

Kamal Haasan
देश-विदेश

Kamal Haasan : तामिळ माझे जीवन, माझे अस्तित्व, कमल हसन यांचा कन्नड भाषेवरील वक्तव्यावर माफी मागण्यास ठाम नकार

ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी न्यायालयाने फटकारल्यानंतरही कन्नड भाषेबाबत वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिला आहे. तामिळ माझे जीवन, माझे अस्तित्व अ्रसल्याचे त्यांनी सांगितले.

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी आपले ठाकरे आडनाव बदलून खान किंवा शेख करावे, नितेश राणे यांची जाेरदार टीका

आदित्य ठाकरे यांनी आपले ठाकरे आडनाव बदलून घेतलं पाहिजे. आदित्य खान किंवा आदित्य शेख केलं पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल.

पुणे

Ajit Pawar : अजित पवार एकटे पडलेत म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावे लागत आहे, राेहित पवार यांचा टाेला

अजित पवार एकटे पडलेत, म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे? हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत? हा ही प्रश्न आहे.

Nationwide census
देश-विदेश

Nationwide census : देशव्यापी जनगणना एक मार्च २०२७ पासून ; पहिल्यांदाच होणार जातनिहाय गणना, डिजिटल पद्धतीचा वापर

मोदी सरकारने देशव्यापी जनगणनेसह हातनिहाय मोजणीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२७ पासून सर्वसाधारण जनगणना सुरू होणार आहे

पुणे

Aditya Thackeray : आमचे मन साफ म्हणत आदित्य ठाकरेंचा युतीसाठी मनसेपुढे हात

शिवसेना ठाकरे आत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युतीच्या चर्चेला आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा हवा दिली आहे.

महाराष्ट्र

Raj Thackeray : सरकार हिंदी भाषा सक्ती करून गोंधळ निर्माण करण्याचा विचार करत नाही का? राज ठाकरेंचा प्रश्न

सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं. मात्र हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हाच सुरुवात झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत.