Naxalites : नक्षलवाद्यांवर कठोर प्रहार आणि पुनर्वसनाचाही आधार, , जहाल माओवादी ‘देवसू’ शरण
राज्य सरकारच्या नक्षलवाद विरोधी रणनीतीला मोठे यश मिळाले आहे. २०१७ पासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला, अनेक चकमकींमध्ये सहभागी व ३.५० लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी ‘देवसू’ उर्फ देवा राजा सोडी (वय २४) याने गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.











