Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadanvis
मुंबई

Devendra Fadanvis : प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा. ब्लॅकआऊट वेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

coronavirus khichdi scam
महाराष्ट्र

coronavirus khichdi scam : काेराेना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांचे आरोपपत्र

खिचडी घोटाळ्याप्रकरणी आठ आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आज (09 मे) किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यात वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंटचे भागीदार सुनील रामचंद्र कदम ऊर्फ बाळा कदम, राजीव नंदकुमार साळुंखे, सुजीत मुकूंद पाटकर, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार संजय चंद्रकांत माशिलकर, प्रांजल संजय मशिलकर, प्रितम संजय मशिलकर, सुरज सतीश चव्हाण, अमोल गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे.

PM meets
देश-विदेश

PM meets : पंतप्रधानांची अजित डाेवाल, सीडीएस आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांसाेबत बैठक

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेला तणाव आणि युद्धाला तोंड फुटण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीडीएस आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांशी बैठक घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक घेतली आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते.

International Monetary Fund
देश-विदेश

International Monetary Fund : दहशतवाद्यांना पाेसणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे बळ, २.३ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पोसले जात असल्याचे भारताने पुरावे देऊनही पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २.३ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. भारताने हा निधी पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता. मतदानास अनुपस्थित राहिला होता.

Pakistan Zindabad
पुणे

‘पाकिस्तान जिंदाबाद’ पोस्ट केल्याप्रकरणी कोंढव्यातील १९ वर्षीय युवतीला अटक

भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, कोंढवा पोलिसांनी एका १९ वर्षीय युवतीविरुद्ध ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि भारताविरोधातील मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

देश-विदेश, विश्लेषण

भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण आमची ठिकाणं उघड झाली असती, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा अजब दावा

भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत दावा केला आहे

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Colonel Sophia Qureshi
देश-विदेश

Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने केलेल्या कारवाईला उत्तर देताना पाकिस्तानने भारतावर थेट ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भारतानेही पाकिस्तानी शहरांवर हल्ला चढवून ठोस प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानच्या बेजबाबदार वागण्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. भारतावर हल्ला करत असतानाही पाकिस्तानने कराची आणि लाहोरमधील नागरी विमानसेवा सुरू ठेवली होती, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिली.

Rashtriya Swayamsevak Sangh
देश-विदेश

Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन

सध्याच्या देशावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशवासीयांना स्पष्ट संदेश दिला आहे. “आपले नागरी कर्तव्य बजावताना कोणतेही देशविरोधी षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका.

IPL 2025 Postponed
देश-विदेश

IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pakistani Drones
देश-विदेश

Pakistani Drones : पाकिस्तानला भारताचा मोठा दणका , हल्ला परतवताना 50 ड्रोन पाडले

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी सीमेवरील विविध भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे एकूण 50 ड्रोन पडून मोठा दणका दिला आहे.

Pakistan's missile
देश-विदेश

Pakistan’s missile : जम्मू, पठाणकोट आणि उदयपूरवर पाकचे क्षेपणास्त्र, ड्राेन हल्ले निष्क्रिय

पाकिस्तानाने जम्मू, पठाणकोट आणि उदयपूर येथील तीन सैन्य ठाण्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्राेन वापरून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सशस्त्र दलांनी हे हल्ले परतवून लावले. त्वरित वापरून या सर्व धमक्या पूर्णपणे निष्क्रिय केल्या; कोणतीही मानवी किंवा सामग्री नुकसानीची नोंद झाली नाही.