Rohit Pawar : पाकिस्तान सुधारणार नाही; इंदिरा गांधींसारखी ठाम भूमिका घ्या, रोहित पवार यांचा सरकारला सल्ला
भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर केवळ तीन तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत केंद्र सरकारला इंदिरा गांधींसारखी कणखर भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.











