Rajnath Singh : भगवान हनुमान यांच्या आदर्शाचे पालन केले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले कौतुक
भारतीय सैन्याने अद्भुत धैर्य आणि शौर्य दाखवून एक नवा इतिहास रचला आहे. सैन्याने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने काम केले आहे. निश्चित केलेले टार्गेट उद्ध्वस्त करण्यात सैन्याला यश आले आहे. आम्ही कोणत्याही नागरी स्थानांवर हल्ला न करता मानवता आणि सतर्कता दाखवली आहे. आम्ही भगवान हनुमान यांच्या आदर्शाचे पालन केले आहे. जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना केले होते. आम्ही फक्त त्यांनाच मारले आहे, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारले होते, असे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.











