Amit Thackeray : हल्लेखोर आत कसे आले? अजून मोकळे फिरतायेत, हे प्रश्न विचारायला नको का? अमित ठाकरे यांचा सवाल
आपण उत्तर दिले ही वेगळी गोष्ट आहे. पण ऑपरेशन सिंदूरमुळे आनंद झाला नाही. कारण पहलगाम हल्ला कशामुळे झाला? पंचवीस लोकांचा जीव घेणारे हल्लेखोर आत कसे आले? ते अजून मोकळे फिरतायेत. आपण हे प्रश्न विचारायला नको का असा सवाल मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी केला आहे.











