Best buses : बेस्ट बसगाड्या गुगल मॅपवर, रियल टाईम लोकेशन कळणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Best buses बेस्ट उपक्रमाची बससेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी मुंबईकर प्रवाशांसाठी सोयीस्कर व सुयोग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आपल्या बसगाडीच्या संचालनाची प्रत्यक्ष (live) माहिती गुगल मॅपवर देण्यास सुरुवात केली आहेBest buses

गुगल आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक उपक्रम (बेस्ट) यांनी गुगल मॅप्सवर बेस्ट सेवांसाठी प्रत्यक्ष बस माहिती प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रणालीचा उदघाटनसमारंभ महाराष्ट्राचे ‘गुगल मॅप वर बसमार्गाची माहिती’ या प्रणालीचा उदघाटन समारंभ पार पडला. या सहयोगाचा उद्देश प्रवाशांना बस येण्याच्या वेळा, मार्ग आणि संभाव्य विलंब याबद्दलचे थेट अद्ययावत माहिती गुगल मॅप अ‍ॅप्लिकेशनमध्ये प्रदान करणे आहे.

यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना, केवळ कोणती बस पकडायची हेच नाही तर त्यांच्या थांब्यावर येणाऱ्या बसची प्रत्यक्ष आगमन वेळ देखील दिसेल. यामुळे अंदाजे प्रवास कालावधी तसेच आणि विलंबाची सूचनाही प्रवाश्यांना मिळणार आहे. प्रत्यक्ष (live) माहितीवर आधारित आगमन वेळा गुगल मॅप्सवर हिरव्या किंवा लाल रंगात चिन्हांकित केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीच्या आधारे गुगल मॅप्स ही माहिती प्रत्यक्षात अद्ययावत करेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, बेस्ट आणि गुगल मॅपमधील हे सहकार्य मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेचा बेस्ट उपक्रमाला देखील फायदा होईल. बस प्रवाशांना बस मिळण्याबाबतची जी अनिश्चितता होती ती यामुळे दूर होईल. परिणामी प्रवास सोपा होण्यास मदत होईल.

Best buses on Google Maps, real-time location will be known

महत्वाच्या बातम्या