Manoj Jarange मनाेज जरांगेंनीच केले मराठा समाजाचे जास्त नुकसान, छगन भुजबळ यांनी हल्लाबाेल
मराठा आंदाेलक मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काहीही फायदा नाही. मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनीच केले आहे.
मराठा आंदाेलक मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काहीही फायदा नाही. मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनीच केले आहे.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात तब्बल 9 ठिकाणी मिसाईल हल्ले केले.
अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतलाच. Operation sindoor ही मोहीम राबवून पाकिस्तानच्या बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद मध्ये तुफानी मिसाईल हल्ला केला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त एका लोगोचे व एका टपाल तिकीटाचेही प्रकाशन केले आहे. याशिवाय अहिल्यादेवी यांचे एक प्रेरणा गीत देखील जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नाराज आहेत, त्यांनी सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भाजपाने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपाला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. राहुल गांधी यांनी पक्ष कार्यालयात बोलावले नाही, घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली, असे त्यांनी सांगितले.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. ४८ तासांत ही त्यांची दुसरी बैठक आहे.
समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थविभागातील शकुनी अशी टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणे हे अतिशय अयोग्य आहे. अजितदादा हे काय आकाशातून पैसे आणणार नाहीत किंवा हे पैसे काही अजितदादांनी घरी नेलेले नाही, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरसाट यांना सुनावले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
भारताने कठाेर कारवाईचा इशारा दिल्यावर पाकिस्तानमध्ये घबराट उडाली आहे. मात्र, तरीही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भारताला उत्तर देण्याच्या वल्गना करत आहेत. त्यांना पाकिस्तानी नेत्यानेच उत्तर दिले असून १९७१ साली झालेला लाजीरवाणा पराभव विसरू नका असे त्यांनी म्हटले आहे.
वडीलांची हत्या, त्यातून उभ्या राहिलेल्या आंदाेलनात सक्रीय सहभाग आणि कुटुंबाची काळजी घेत मस्साजोगचे सरपंच संतोष यांची कन्या वैभवीने बारावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळविले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला फोन करून तिचे अभिनंदन केले. सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला पत्र सुद्धा लिहून बारावीच्या यशाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगाला दिलेत. निवडणुकांची अधिसूचना 4 आठवड्यांच्या आत काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे.
आपल्याला मराठीचा गर्व असलाच पाहिजे. पण, मराठी बोलता बोलता जर आपला मुद्दाच पोहचला नाही तर मराठीचे काय लोणचे घालायचे? असा प्रश्न अध्यात्मिक गुरू गाैर गाेपाल दास यांनीउपस्थित केला