Pakistan Army Chief : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची वल्गना ,संपूर्ण लष्करी ताकदीनं उत्तर देऊ
भारत कठोर पाऊल उचलणार या धास्तीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली असताना लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या वल्गना सुरूच आहेत. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर किंवा अखंडतेवर गदा आली, तर पाकिस्तान संपूर्ण लष्करी ताकदीने उत्तर देईल, अशी वल्गना त्यांनी केली आहे.











