C. R. Patil : पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचा इशारा
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने १९६० चा सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की पाकिस्तानकडे भारतातून एक थेंबही पाणी जाणार नाही.”











