Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : खूप लाेकांनी चुना लावला, एक रुपयात विमा याेजनेवर अजित पवारांचे वक्तव्य

राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा देण्याची याेजना सुरू केली आहे. या याेजनेत भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणेही पुढे आली आहेत. आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनीच या याेजनेवर भाष्ट केले आहे. एक रूपयांत पीकविमा योजनेत खूप लोकांनी आम्हाला चूना लावला आहे, असे अजित पवार म्हणाले,

Harshwardhan Sapkal
मुंबई

Harshwardhan Sapkal : अजित पवारांना मंत्रीमंडळातून बरखास्त करा, माधव भांडारींच्या वक्तव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई शहरावर झालेल्या 26/11 रोजीच्या हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा हात होता या भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या वक्तव्यावरून राजकीय गदाराेळ सुरू झाला आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर तहव्वूर राणासाेबत माधव भांडारी यांचीही चाैकशी करावी. ताेपर्यंत त्या काळात मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी केली आहे

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar : कर्जतमध्येच राेहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम, नगरपंचायत भाजप नेते राम शिंदे यांच्या ताब्यात

राज्य पातळीवरील नेते बनू पाहत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांना घरच्या मैदानावरच माेठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करत कर्जत नगर पंचायत ताब्यात घेतली आहे.

Zeeshan Siddiqui
मुंबई

Zeeshan Siddiqui : माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे

Pune Porsche car पुण्यातील पाेर्शे कार अपघात प्रकरणात माेठी कारवाई, रक्ताचे नमूने बदलणाऱ्या डाॅक्टरांचे परवाने रद्द

पुणे पोर्शे अपघातप्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोन्ही डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, किंबहुना ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ध्येय महाराष्ट्र प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

MNS
मुंबई

MNS : मुंबई महापालिकेच्या प्रश्नांवर मनसेचे ‘प्रतिसभागृह’, आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांना आमंत्रण

मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा – निवडणूक कधी होणार? सध्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून चालवला जात असून, निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईतील समस्यांवर मोकळेपणाने चर्चा घडवण्यासाठी “प्रतिसभागृह” या अभिनव संकल्पनेची घोषणा केली आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : जरा जपून, हात पुढे कराल आणि पाय खेचले जातील… राज ठाकरेंना शिंदेंच्या नेत्याचा आपुलकीचा सल्ला

जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, असा आपुलकीचा सल्ला सन्माननीय राजसाहेब आपणास देतो असे शिंदे गटाचे नेते आणि गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल; मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : विदेशात भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करा, मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना सल्ला

निवडणुकीतील पराभवामुळे मनावर परिणाम झाल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पराभवाचे आत्मचिंतन करून त्यांनी जनतेत जाऊन काम करावे, असा सल्लाही यावेळी फडणवीसांनी दिला.

Radha Mohandas Agarwal
देश-विदेश

Radha Mohandas Agarwal : नव्या वक्फ कायद्यामुळे मुस्लिम समाजाला लाभ, राधा मोहनदास अग्रवाल यांचा दावा

वक्फ (Waqf) सुधारणा कायद्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली असून, या मोहिमेचं नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार राधा मोहनदास अग्रवाल करत आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “हा कायदा पूर्णतः मुस्लिम समाजाच्या हिताचा असून, चुकीची माहिती देणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी ही मोहीम आहे.”

Suhas Kande
महाराष्ट्र

Suhas Kande : वाद पुन्हा पेटला, समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस असल्याचा सुहास कांदे यांचा आरोप

नांदगाव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे. समीर भुजबळांवर मला दया येत आहे. हुसकलेले असताना ते परत येत आहेत, अशी टीका आमदार सुहास कांदे यांनी केल्याने भुजबळ – कांदे वाद पुन्हा पेटला आहे.