Quran Hafiz Ehsan : इस्लामनुसार मूर्तीपूजा बलात्कारापेक्षा मोठा गुन्हा, कुराण हाफिज एहसानचं वादग्रस्त विधान
सध्या सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामध्ये एहसान नावाच्या एका व्यक्तीने इस्लाममधील गुन्हेगारी संकल्पनांबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. कुराणचे संपूर्ण पठण केलेल्या आणि ‘हाफिज’ ही उपाधी मिळवलेल्या एहसानने ‘द राष्ट्रनीती’ या माध्यमाशी संवाद साधताना म्हटलं आहे की, “इस्लामनुसार मूर्तीपूजा (शिर्क) हा बलात्कारापेक्षाही मोठा गुन्हा आहे.”











